मराठी चारोळी संग्रह | Best Marathi Charoli Sangrah

Marathijournal
1 min readMar 7, 2021

--

मराठी चारोळी संग्रह (Marathi Charoli Sangrah) :

चारोळी म्हणजे काय ? चार ओळीच्या कवितेला चारोळी म्हणजेच चारोळ्या म्हणतात. मोजक्याच शब्दात परंतु मनातील संवेदना ओळीमधुन जगापुढे माडण्याची एक पद्धत. एकंदरीत चारोळी जरी काल्पनिक असल्या तरी त्यातील शब्दरुपी संवेदना आपल्या सर्वांनच्या मनात कायम घर करून जाते आणि आपल्या पुढील वाटचलीस प्रेरणादाई ठरते.

म्हणुन अश्या काही खास मराठी चारोळी संग्रह तुमच्यासाठी आणला आहे. निश्चित हा मराठी चारोळ्या संग्रह तुमच्या पसंतीस उतरेल. मराठी चारोळी संग्रह आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेयर करायला विसरु नका.

आयुष्य मराठी चारोळी (Marathi Charoli On Life) :

  • जीवनात सगळंच मिळत नाही
    म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
    कुठल्यातरी वळणावर
    आपला वाट पाहणाराही असतो.
  • सरता सरता आयुष्य माझं
    मी कधी माझा झालोच नाही,
    दु:ख सोसले अफाट मी, पण
    सुखाचा साथी, कधी झालोच नाही.
  • जीवन कसे पक्ष्यांसारखे असावे,
    कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
    आणि मरताना देखील कधी कुणावर
    आपले ओझे न देता जावे.
  • जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात,
    काही आपल्याला साथ देतात काही सोडून जातात.
  • जीवनात कोणीतरी
    कुणाच खास असाव लागतं,
    त्याला जीवनात
    जीवापलीकडे जपावं लागतं.
  • होकारांला शब्दांना महत्व नसते
    दाटल्या भावानांना काही बंध नसते,
    डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,
    प्रेमात शब्दांची गरज नसते.

Click Fore More : मराठी चारोळी संग्रह | Best Marathi Charoli Sangrah

--

--

No responses yet